जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे आपले कर्तव्य पणाला लावून शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत शिक्षण सुरु ठेवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ के बी पाटील हे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील, रवींद्रभैय्या पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण, .कल्पनाताई पाटील उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्ष, अभिषेक पाटील महानगराध्यक्ष,कुणाल पवार महानगर सचिव,स्वप्निल नेमाडे शहराध्यक्ष हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतामध्ये माजी कुलगुरू के. बी. पाटील यांनी शिक्षकांनी आपले कार्य जबाबदारी करावे.ऑनलाईन शिक्षणाला कर सामोरे जावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांची होणारी तारेवरची कसरत आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याविषयीं मोलाचे मार्गदर्शन केले. व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ. सतिष पाटील यांनी शिक्षकांच्या कार्याचे समाजातील महत्व यावर भाष्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील तर आभार मनोज भालेराव यांनी केले.