• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांसह दोन नेत्यावर गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 12, 2022
in राजकारण, राज्य
0

मुंबई : वृत्तसंस्था

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे व आमदार भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कायदा माझ्या बापाने लिहिला आहे, मी कायद्याचा आदर करणारच अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच राजकीय नकला राज ठाकरेही करतात आणि सत्य बोलणे गुन्हा असेल तर आहोत आम्ही गुन्हेगार आहोत, असेही अंधारे म्हणाले.

नेमकं काय घडलं
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन गटांत हाणामारी होईल, या उद्देशाने या तिन्ही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, असा आरोपही या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अंधारे, जाधव व राऊत त्यांच्यावर कलम 153, 500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, कलम 500 ,504 अंतर्गत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हाही या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

कायदा माझ्या बापाने लिहिलाय
कायदा माझ्या बापाने लिहिला आहे, मी कायद्याचा आदर करणारच अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच राजकीय नकला राज ठाकरेही करतात आणि सत्य बोलणे गुन्हा असेल तर आहोत आम्ही गुन्हेगार आहोत. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वगैरे काहीच वाटलं नाही. मी या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली प्रीपेड होतेच. हे सगळं अपेक्षित आहे. मला नोटीस आली तर नक्की जाईन असंही अंधारे म्हणाल्या. जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना अशा प्रकारेच दंड शाही दाखवली जाईल. 153 अ नुसार हा गुन्हा दाखल झाला असून, माझ्याकडे अजूनही रीतसर प्रत आली नाही. मी जे केलं ते नक्कल नाही. मोदीजींनी जे सांगितलं तेच मी माझ्या भाषणात बोलले. राज ठाकरे माझ्यापेक्षा जास्त अशा नकला करतात असं म्हणत अंधारे यांनी भाषणाबाबत खुलासा केला आहे.

Previous Post

जळगावातील महिलेवर अत्याचार

Next Post

बूथ रचना मजबूत करा ; गुलाबराव देवकर यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आवाहन !

Next Post

बूथ रचना मजबूत करा ; गुलाबराव देवकर यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group