जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका ३२ वर्षीय महिलेस वेगवेगळ्या शहरात घेवून जात एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दत्तात्रय सोनजे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरातील राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेस २०१९ पासून ते २०२२ पर्यंत वेळोवेळी लग्नाचे आमिष देत तसेच पुणे, जळगाव, धुळे या ठिकाणी घेवून जात वेळोवेळी संशयित आरोपी निलेश सोनजे याने अत्याचार केला. महिलेने नकार दिल्यानंतर निलेशने तिच्या मुलांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निलेश सोनजे याच्या विरोधात रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी रोहिदास गाभाले हे करीत आहेत.