जळगाव : प्रतिनिधी
राज्यात शिंदे गटाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांनी नवीन गट स्थापन केल्यापासून अनेक चर्चेन उत आला आहे. तर दुसरीकडे नुकतेच शिंदे व ठाकरे गटाला नवीन नाव व चिन्ह मिळाल्याने आप आपले कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त करत असताना जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका माजी जिल्हाध्यक्षांनी रात्री उशिरा फेसबुकवर धनुष्यबाण व ‘जय श्री राम’ चा नारा दिल्याने जिल्हात एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
काय आहे फेसबुकवरील पोस्ट?
गेल्या दोन दिवसात शिंदे व ठाकरे गटाला चिन्ह मिळाले त्याआधी धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर हे आता पक्षचिन्ह कुणाचे एकाचे सध्या तरी नाही, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी रात्री उशिरा फेसबुकवर ‘जय श्री राम’चा नारा देत धनुष्यबाण हे ठेवल्याने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिषेक पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतात की काय ? असा प्रश्न सामान्य कार्यकर्ते विचारू लागले आहेत.