Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे साहेब…हि फुट वाढतच गेली घरातही फुट पडतेय
    राजकारण

    शिंदे साहेब…हि फुट वाढतच गेली घरातही फुट पडतेय

    editor deskBy editor deskOctober 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात शिवसेनेत उभी फुट पडल्याचे संपूर्ण राज्याने पाहिली हि इतकी मोठे फुट होती की राज्यातील भरपूर परीवारामध्येही फुट पडायला लागली आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पाटेकर यांनी शिवसेनेत झालेल्या गटबाजीबाबत भाष्य केलं आहे.

    ‘एकनाथराव, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष. पण, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता ते वाढत गेलं आहे. त्याचं काय करायचं आम्ही? तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरुयेत, पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?’, हा भाबडा प्रश्न नानांनी एक सर्वसामान्य मतदार म्हणून विचारला. उद्या तुम्ही या कुटनितींना राजकारणाचं नाव द्याल, असं म्हणत पक्षामध्ये माजलेल्या या दुफळीवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

    मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं, तो मतदारांचा आदरच केला. 2019 ला जे होणं अपेक्षित होतं ते आम्ही केलं. मतदारांनी सेना-भाजप युतीला निवडून दिलं. त्याप्रमाणे सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच तसं झालं नाही. पण, आम्ही ते तीन महिन्यांपूर्वी केलं’, यावर प्रतिप्रश्न करत त्यासाठी अडीच वर्ष का लागली? अशी गुगलीही नानांनी टाकली. यावर प्रयत्न सुरु होता पण, तीन महिन्यांपूर्वी त्याला यश मिळालं असे उत्तर फडणवीसांनी दिलें.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.