Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपात प्रवेश करण्यास सौरव गांगुलीने दिला नकार म्हणून बीसीसीआय अध्यक्षपद नाकारलं?
    क्रिंडा

    भाजपात प्रवेश करण्यास सौरव गांगुलीने दिला नकार म्हणून बीसीसीआय अध्यक्षपद नाकारलं?

    editor deskBy editor deskOctober 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसने मात्र गंभीर आरोप केला आहे. पक्षात प्रवेश केला नसल्यानेच भाजपा सौरव गांगुलीचा अपमान करत असल्याचा त्यांचा दावा आहे.
    तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटलं आहे की “भाजपाने गतवर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगवली होती”. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची शक्यता आहे, मात्र सौरव गांगुलीना पद नाकारण्यात आलं हे राजकीय सूडबुद्दीचं उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

    गेल्या आठवडय़ाभरात ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे ३६वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. जय शाह यांची ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी फेरनिवड होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मंडळातही गांगुलीऐवजी शाह ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. “सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याचा संदेश भाजपा राज्यात देऊ इच्छित होती. आम्ही याप्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. पण भाजपाने निवडणुकीच्या आधी आणि नंतरही अशा प्रकारचा प्रचार केला असल्याने त्यावर उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे. भाजपा गांगुलीचा अपमान करु इच्छित असल्याचं दिसत आहे,” असं कुणाल घोष यांनी सांगितलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.