धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिक विमा व अतिवृष्टी वंचित महसूल मंडळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१-२२ या खरीप हंगामात झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे महसूल मंडळ सोनवद व इतर मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला शासनाने अतिवृष्टी तसेच पिक विमा देण्याचे जाहीर केले होते परंतु धरणगाव तालुक्यातील काही महसूल मंडळांना अद्याप लाभलेला नाही, हा तालुक्यातील शेतकन्यांवर अन्याय झालेला आहे व त्या सोबत किंचित शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसणे या सारखा अल्प असा पिक विम्याचा लाभ मिळालेला आहे. हे विषय प्रदिर्घ दिवसांपासून प्रलंबित असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. संततधार पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले असून पिक विमा संरक्षण व पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी. वरील मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडून प्रसंगी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना यावेळी किशोर निकम, राजेंद्र पाटील, गोरख देशमुख, जितेंद्र महाजन, अविनाश बाविस्कर यांनी दिले आहे.