धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे आज दि ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दुपारी ११ वाजता निवडणूक आयोगाचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष तथा युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी केले.
४० गदारांच्या खांद्ययावर बंदूक ठेवून केद्र सरकार निवडणूक आयोगाचा वापर करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे, तुम्ही धनुष्यबाण गोठवू शकतात शिवसेना नाव गोठवू शकतात पण स्व.बाळासाहेबांनी जे जनतेच्या मनामध्ये कोरलेले नाव आहे ते मिटवू शकत नाही अशी विनंती वाघ यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. जशी ईडी आहे सीबीआय आहे तशी निवडणूक आयोग आहे हे सर्व केद्र सरकारच्या इशारावर ४० गदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे केद्र सरकार शिवसेनेला संपवू पाहत आहे. पण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हा पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही, आता हातात मशाल घेतली आहे, कोण कुणाला भस्मासात केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, म्हणून आज निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात येत आहे असे हि ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ यांनी म्हटले आहे.
शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, माजी जि.प.सदस्य जानकीराम पाटील, माजी पंचायत समिती सभापती दीपक सोनवणे, जिल्हा संघटक शरद माळी, शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांच्यासह सर्व शिवसेना नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.