Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिले तीन नवे चिन्ह
    राजकारण

    शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिले तीन नवे चिन्ह

    editor deskBy editor deskOctober 11, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    निवडणूक आयोगाने शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आली आहेत. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत.

    दरम्यान, शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह सादर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दुसरे चिन्ह तुतारी फुंकणारा व्यक्ती आणि तिसरे चिन्ह शंख अशी चर्चा सध्या होत होती पण शिंदे गटाकडून तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर करण्यात आली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलं आहे.

    दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार शिंदे गटानेही तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हे तीन पर्याय दिले होते तर दोन्ही गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्ह सारखे असल्यामुळे ते कुणालाच देण्यात आले नाहीत. गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारत शिंदे गटाला दुसरे पर्याय देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता इमेल करत शिंदे गटाने तीन निवडणूक चिन्हे सादर केली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.