मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात शिंदे गटाने आपला दबदबा आणून राजकीय समीकरण बदलवून टाकले आहेत. अशातच निवडणूक आयोगाने देखील शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेला धनुष्यबाण गोठवला आहे. यावेळी मातोश्रीवर प्लॅनिंग सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना प्रमुख विरोधक बनवण्याचं प्लॅनिंग सुरु असल्याचं समोर आलं आले आहे.
उद्धव ठाकरे यांना शपातळीवर विरोधक म्हणून ठेवण्याचं प्लॅनिंग –
शरद पवार , ममता बॅनर्जी यांसारख्या नेत्यांच्या रांगेत उद्धव ठाकरेंना देशपातळीवर विरोधक म्हणून ठेवण्याचं प्लॅनिंग मातोश्रीवर सुरु असल्याचं म्हटलं जातं आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेची साहनुभूती मिळेल आणि ज्याप्रमाणे मुघलांच्या काळात मराठ्यांनी दिल्लीचं तख्त हादरवलं होतं, तसेच आव्हान आताच्या दिल्लीलाही मिळेल, असा दावा सेना नेत्याने केला आहे.
निवडणूक आयोगा धक्का – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता अंधेरी पोटनिवडणूकीत धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर दोन्ही गटांनी नवनी नावं जाहीर करतानाच आयोगाने आणखीन एक धक्का देत शिवसेना हे नाव देखील गोठलं आहे उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, ही नावं देण्यात आली होती. याबाबतची माहिती अरविंद सावंत यांनी दिली होती.