पारोळा : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय युवतीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरात १७ वर्षीय युवती आपल्या आई, वडील व भावासोबत वास्तव्यास आहे. युवती दि ८ रोजी सायंकाळी ५ वाजता दुकानात जावून येते असे सांगून गेल्यावर रात्री ८ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने वडिलांनी परिसरात विविध ठिकाणी शोध घेतला असता परंतु मिळून न आल्याने वडिलांनी लागलीच पारोळा पोलिसात धाव घेत कुणीतरी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्या आला आहे. पुढील तपास रविद्र बागुल हे करीत आहेत.