Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कबड्डी कबड्डी…साडी नेसून कबड्डी कबड्डी कबड्डी !
    क्रिंडा

    कबड्डी कबड्डी…साडी नेसून कबड्डी कबड्डी कबड्डी !

    editor deskBy editor deskOctober 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुरुषाप्रमाणे महिलाही आता सर्वच खेळामध्ये अग्रेसर दिसू लागल्या आहेत. तर प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डी घराघरांत पोहचली. एक काळ असा होता की कबड्डी हा खेळ फक्त गल्लीबोळात दिसायचा, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना ते कळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. कबड्डीची ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. यावेळी देशभरातून १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बरं, तुम्ही लहानपणीच कबड्डी खेळली असेल. तसे पाहिले तर पुरुष सहसा कबड्डी खेळताना दिसतात किंवा मुलीही काही ठिकाणी छंद जोपासत खेळतात, पण साडी नेसून कबड्डी खेळणाऱ्या महिलांना तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एकदम भन्नाट आहे. साडी नेसून कबड्डी कबड्डी करणाऱ्या अशा महिला तुम्ही कधीही पाहिल्या नसतील.

    महिला साडी नेसून कबड्डी कशी खेळत आहेत आणि त्यांना कबड्डी खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप गर्दी करतायत.व लोक त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि स्त्रियाही एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत असल्याप्रमाणे खेळण्यात व्यस्त आहेत. महिलांची ही कबड्डी छत्तीसगडिया ऑलिम्पिकचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

    किंबहुना छत्तीसगडच्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगढिया ऑलिम्पिक सुरू करण्यात आले असून, त्यात गिली दांडा ते पिटुल, लंगडी शर्यत, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच आणि गोट्या इत्यादी १४ प्रकारच्या प्रादेशिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केलाय. 51 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवारांना अखेरचा निरोप; बारामतीत जनसागर, अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वावर खळबळ

    January 29, 2026

    अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने कणखर नेतृत्व गमावले – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    January 28, 2026

    शेवटचे शब्द आणि भीषण स्फोट; अजित पवारांसोबत कोण होते ?

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.