जळगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एलसीबीच्या तत्कालिन पीआय किरणकुमार बकाले प्रकरणाचा तपासी अधिकारी महिन्याभरात बदलण्यात आला आहे. एसपी डाॅ. प्रविण मुंढे यांनी आता या प्रकरणाचा तपास हाेम डीवायएसपी संदीप गावीत यांच्याकडे साेपविला आहे. त्यांनी बकाले यांना शाेधणे व अटकेसाठी चार नवे पथक निर्माण केले आहेत.
पीआय बकाले यांची ऑडिओ क्लीप १५ सप्टेंबर राेजी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाचा तपास जिल्हा पेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे हाेता. जिल्हापेठ पाेलिसांच्या तीन पथकांनी दाेन वेळा ठाणे व एकदा नाशिक येथे बकाले यांचा शाेध घेतला परंतु अपयश आले. अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळून दहाबारा दिवस उलटूनही बकालेंना अटक हाेत नसल्याने मराठा समाजासह सर्व समाजातर्फे दि. १० पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपाेषण होणार आहे. यामुळे पाेलिस अधीक्षक डाॅ. मुंढे यांनी मंगळवारी तपास डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे साेपवला आहे