जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून एका तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील मुख्य रस्त्यावरून दि ३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २७ वर्षीय तरुण अंकुश दल्लू राठोड याची क्र.एम.एच.२०.एफ.के.२३२० दुचाकी २० हजार रुपये किमतीची लांबविल्याची घटना घडली आहे. त्याने तत्काळ जळगाव शहर पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किशोर निकुंम करीत आहेत.