मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केली असून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर शेतकऱ्यांना मोठी चिंता निर्माण झाली असून सोयबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तीन ते चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल यवतमाळ, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत हजेरी लावली. तर सोयाबीनचे पीक काढायला आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा हे चार जिल्हे वगळता राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली तर काही भागांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.