जळगाव : प्रतिनिधी
२९ वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर याचाच फायदा घेत सोबत काम करणाऱ्या एकाने विवाहितेला आपल्या गावी बिहारमध्ये बोलवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिडीत विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विवाहीतेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पिडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेशकुमार याने पिडीतेला गावाकडे बोलवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच सदरची घटना कोणासही सांगू नको, अशी धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि दिपक जगदाळे हे करीत आहेत.