Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवनीत राणांचा घणाघात : उद्धव ठाकरेंचे संतुलन पूर्ण बिघडले
    क्राईम

    नवनीत राणांचा घणाघात : उद्धव ठाकरेंचे संतुलन पूर्ण बिघडले

    editor deskBy editor deskOctober 6, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संतुलन पूर्ण बिघडले आहे. दसरा मेळाव्याच्या त्यांच्या भाषणातून हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले, असा घणाघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नागपूर येथे केला आहे.

    नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात केवळ एकनाथ शिंदेंविरोधातील राग, द्वेष दिसून येत होता. त्यांनी स्पष्टपणे तसे बोलूनही दाखवले. उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी अडखळत होते. केवळ ‘बाप चोरला, बाप चोरला’, असेच उद्धवजी म्हणत होते. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेचे वारस आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत.

    उद्धव यांनी विचार करावा
    नवनीत राणा म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबत 40 आमदार गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी याबाबत विचार करावा. बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची लावून एकनाथ शिंदेंनी भाषण केले. त्यामुळे सर्व राज्यातून लाखो शिवसैनिक शिंदेंचे विचार ऐकण्यासाठी बीकेसीवर जमले होते.

    फक्त मातोश्रीवर बसून राहतात

    नवनीत राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीही मातोश्रीबाहेर निघाले नाहीत. केवळ फेसबूकच्या माध्यमातून कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ती आश्वासने ही पाळली नाहीत. आता एकनाथ शिंदे सर्वांना भेटून त्यांची कामे करत आहेत. तेच बाळासाहेबांचे वारसदार शोभतात.

    अडीच वर्षे हिंदुत्व आठवले नाही
    आमदार रवी राणा यांनीही उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर टीका केली. रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस व राष्ट्रवादीची काँग्रेसची विचारधारा मांडली आहे. आता शिवसेना हातातून जात असल्यामुळे त्यांना हिंदुत्वाची आठवण येत आहे. सत्तेत असताना अडीच वर्षे त्यांना हिंदुत्व आठवले नाही. त्यामुळेच सच्च्या शिवसैनिकांनी त्यांना झटका दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.