जळगाव : प्रतिनिधी
शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबई मधील बीकेसी मैदानावर आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर दि ४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटातील जळगाव जिल्ह्यातील १० हजार कार्यकर्ते मुंबई दाखल झाले असल्याची प्रतिक्रिया शंतनू नारखेडे यांनी दिली आहे.
दि ४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी तब्बल १० हजार कार्यकर्ते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले असून बीकेसी मैदानावर आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात हे कार्यकर्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटणार आहे. यावेळी दिनेश जगताप, शंतनू नारखेडे, जीतेद्र गवळी यांच्यसह हजारो कार्यकर्ते बीकेसी मैदानावर पोहचले आहे.