पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील गजानन नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा ३ लाखासाठी सासरचे मंडळी छळ करीत असल्याचा गुन्हा दि ४ रोजी पाचोरा पोलिसात विवाहितेने दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील गजानन नगरातील माहेर असलेली विवाहिता अनिता दीपक जाधव (वय २८) हिला चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील सासर आहे. वर्ष २०१२ ते २०१८ पर्यंत विवाहितेला माहेरून ३ लाख रुपये वाहन खरेदीसाठी आणावे म्हणत तीचा छळ करून मारून टाकण्याची हि धमकी पती दीपक सुकदेव जाधव, सासरे सुकदेव दगा जाधव, सासू प्रमिला सुकदेव जाधव, जेठ मुकेश जाधव, जेठानी योगिता जाधव, नणद पूनम मराठे सर्व रा. मोठ्या विहिरीजवळ टाकळी प्र.चा. याच्या विरोधात पाचोरा पोलिसात स्त्री अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे