पाचोरा प्रतिनिधी । भाड्याने दिलेली बैलगाडी तक्रारदाराला मिळवून देण्यासाठी 4 हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाने पाचोरा शहरात सापळा रचून रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही, उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी ५ हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे याला ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.