Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दसरा मेळाव्यासाठी शिवसेना – शिंदे गटाचे “शिवसेना स्फूर्तीगीत” झाले रिलीज !
    जळगाव

    दसरा मेळाव्यासाठी शिवसेना – शिंदे गटाचे “शिवसेना स्फूर्तीगीत” झाले रिलीज !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 4, 2022Updated:October 4, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाणीपुरवठामंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची संकल्पना

    मुंबई / जळगाव प्रतिनिधी : शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या मेळाव्याची उत्सुकता केवळ राज्यात नसून देशभरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गटाचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे. आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले. “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी या गीता बद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

    या गीत अनावरण प्रसंगी शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे तसेच या गीताची निर्मिती करणारे प्रभारंग फिल्म्स्, पुणेचे संचालक संदिप पांडुरंग माने, उर्मिला चोपडा – हिरवे, शरद डहाळे आदींची उपस्थिती होती.

    काल शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आनंद शिंदे यांना घेऊन त्या गटाचे गाणे तयार करण्याची चर्चा सुरू असतानाच आज थेट गाणे लाँच करून दोन गटात सुरू असलेल्या टीझर वॉरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. ‘आम्ही शिवबाचे धारकरी. शिवसेनेचे मानकरी’
    अशा ओळी असलेले हे गाणे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार ‘प्रभारंग फिल्म्स् यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे.

    या वेळी बोलताना शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ” या गीताच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या
    शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखात स्वराज्याचं बीज पेरलं, त्याच ध्यासानं बाळासाहेबांनी मराठी मनांत स्वाभिमानाची ज्वाला पेटविली. शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या स्वराज्य पालखीची धुरा घेऊन साहेबांनी सुवर्ण इतिहास लिहिला. या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन शिवसेनेचा प्रवास सुरू झाला.

    अन् संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं. शिवसेनेचा हाच धगधगता प्रवास हे या स्फूर्तीगीताचं प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. उद्या बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे स्फूर्तीगीत लाँच करत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असं अभिमानानं म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात आनंद असेल. अन्
    शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल!” या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

    निर्माते संदीप माने, कार्यकारी निर्मात्या उर्मिला हिरवे, गीतकार संतोष सातपुते, संगीतकार पार्थ उमराणी, एडिटर सत्यजित पाटील, शरद डहाळे या टीम ने अत्यंत कमी वेळेत हे गीत तयार करण्याचे आव्हान पूर्ण केले.

    प्रभारंग फिल्म्स् चे संचालक संदिप माने म्हणाले, “शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी या गीताची संकल्पना मांडली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवरायांनी दाखवलेल्या स्वराज्य मार्गावरून करोडो माणसांना सोबत घेऊन निघाले. भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हे गीत तयार करताना हेच सूत्र ‘प्रभारंग फिल्म्स’च्या टीमच्या ध्यानीमनी होते. गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजाने या गाण्यात अनोखा जोश निर्माण केला आहे. प्रत्येक शिवसैनिकाला आपलंसं वाटणारं, तना-मनात चैतन्य फुलवणारं हे स्फूर्तीगीत आहे. यातील ‘शिवसेनेचे मानकरी’ ही उपमा प्रत्येक शिवसैनिकाला सुखावणारी आहे. या गीतातून
    आदरणीय साहेबांचा अनुकरणीय प्रवास नि कोटी कोटी शिवसैनिकांच्या मनी असलेले त्यांच्या साहेबांबद्दलचे प्रेम, आदर आणि निष्ठा अधोरेखित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.