• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

editor desk by editor desk
October 4, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
Big Breking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का

मुंबई : प्रतिनिधी

100 कोटी खंडणी प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 11 महिन्यांपासून अनिल देशमुख कोठडीत आहेत.

ईडीने अनिल देशमुखांना 100 कोटींच्या मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटक केली होती. अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. या कारवाईला 60 दिवस होऊन गेल्यामुळे नैसर्गिक हक्कानुसार जामीन मिळावा असा अर्ज अनिल देशमुख यांनी आधी देखील कोर्टात जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
ईडीने अनिल देशमुखांविरोधात 29 डिसेंबर 2021 रोजी सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांना ईडीने मुख्य आरोपी केले आहे. याआधी मुंबईतील 1750 बार, रेस्टॉरंट, हॉटेल आदी आस्थापनांकडून नियमित खंडणी वसुली करुन दरमहा 100 कोटी रूपये जमा करून द्यायचे अशा स्वरुपाचा तोंडी आदेश देशमुखांनी एपीआय सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या पत्राची दखल घेऊन मुंबईच्या उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयच्या चौकशीत मनी लाँड्रिंग झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. यानंतर ईडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Previous Post

मुलीचा वेश करने पडले महागात ; तरुणांनी केली मारहाण

Next Post

Telegram App यूजर्संना दसऱ्याच मोठ गिफ्ट !

Next Post
Telegram App यूजर्संना दसऱ्याच मोठ गिफ्ट !

Telegram App यूजर्संना दसऱ्याच मोठ गिफ्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group