Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलीचा वेश करने पडले महागात ; तरुणांनी केली मारहाण
    क्राईम

    मुलीचा वेश करने पडले महागात ; तरुणांनी केली मारहाण

    editor deskBy editor deskOctober 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्यात. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले होते की अशी कुठलीही टोळी सक्रीय नाही परंतु काही ठिकाणी अनोळखी व्यक्तींना पाहून नागरिकांनी चांगलेच बदडले आहे. तशा घटना नाशिक, सांगली, जळगाव येथून समोरही आल्या होत्या. दरम्यान, आता पुण्यातही एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही व्यक्ती मुलीच्या वेशात फिरत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी या व्यक्तीला जाब विचारला. पण नीट उत्तरं न देता आल्यानं अखेर या व्यक्तीला तरुणांनी जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.

    पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. चकीत करणारी बाब म्हणजे ही व्यक्ती मुलीच्या वेशात होती. या व्यक्तीला काही तरुणांनी जाब विचारला आणि त्यानंतर त्याला मारण्यास सुरुवात केली. शिव्या, लाथा, बुक्के आणि काठ्यांनी या व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली.
    खडकवासला धरणाच्या मागच्या बाजुला असलेल्या पुलावर ही मारहाण झाल्याचं व्हिडीओत दिसून आलंय. या मारहाणीचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. संशयास्पद वर्तवणुकीमुळे या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातंय.
    आपण प्रोफेसर आहोत, असा दावादेखील ही व्यक्ती व्हिडीओमध्ये करताना दिसली. त्यानंतर तरुणांनी आणखीनंच संतापाने या व्यक्तीला मारहाण करण्यात सुरुवात केली. खडवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावरील रस्त्यावरच मारहाणीची ही घटना घडली. आधी नाशिकमध्ये आणि नंतर सांगलीत बुरखा घालून आलेल्या व्यक्तींना मारहाण करण्यात आलेली. रत्नागिरीतही अशीच घटना समोर आलेली. मुलं चोरणारे आहेत असं समजून ही मारहाण करण्यात आलेली होती. त्यानंतर आता पुण्यातही मारहाणीची घटना समोर आलीय.अद्यापतरी या मारहाणीबद्दल कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हात जोडून गयावया करत असतानाही काही तरुणांनी अमानुषपणे या व्यक्तीला चोप दिल्याचं व्हिडीओ दिसलंय. या व्यक्तीला शिव्या देताना, लाकडी काठीने त्याच्या शरीरावर जोरदार प्रहार करतानाचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा आहे.

    या व्हिडीओमध्ये मुलीच्या वेषात असलेला व्यक्ती मार खात खात अक्षरशः रडकुंडीला आला होता. तो तरुणांजवळ दयेची भीक मागत होता. पण तरिही तरुणांच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही. या व्यक्तीला पळवून पळवून तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणांनी या व्यक्तीला मारहाण करणं सुरुच ठेवल्याचं दिसून आलंय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलीस नेमकी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.