धरणगांव : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या कार्य कृषि विभागा अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतक-यांच्या कोरडवाहू क्षेत्रातील शेती बाबत आत्मविश्वास वाढवणे हा या योजनेक उद्देश आहे योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द व मोद बुद्रुक या गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये दुग्धोत्पादन पशुधन आधारित शेती पद्धती, मुरघास युनिट, व कांदाचाळ काढणी पश्चात साठवण तंत्रज्ञान था घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेत जास्तीत – जास्त शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि विभागाच्या वतीने या आले आहे. याबाबत मा. श्री किरण. एच देसले, सालुका कृषि अधिकारी, धरणगाव व श्री पदमाकर बसन पायल, कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष गाव बैठका घेऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.