• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.खडसे यांची आता भाजपात समेट होणे शक्य नाहीच : अशोक लाडवंजारी

editor desk by editor desk
October 4, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
आ.खडसे यांची आता भाजपात समेट होणे शक्य नाहीच : अशोक लाडवंजारी

जळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कधीकाळी महाराष्ट्र भाजपाचे आधारवड आ. एकनाथराव खडसे यांच्या बद्दल काही दिवसांपासून नको त्या वावटळ्या उठवण्याचे काम भाजपाकडून सातत्याने होत आहे काहीही आधार नसलेल्या बातम्या समाजात पेरून खुद्द आ.खडसेंना बदनाम करण्याचे,त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू आहे जेणेकरून जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दमदार कामगिरीला कुठेतरी लगाम लागेल.

त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये होईलत्यांच्या मध्ये संभ्रम तयार करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला पोषक वातावरण तयार होऊन फायदा होईल मात्र कितीही काही झाले तरी ज्या भाजपाने नाथाभाऊंची गेल्या ४० वर्षाची अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द कूटनीतीने संपवण्याचा घाट रचला,त्या भाजपासोबत नाथाभाऊंची समेट यापुढे कधीही शक्य नाही “असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी मांडले. प्रसंगी आमदार खडसें बद्दल भाजपाकडून सुरु असलेल्या या घाणेरड्या राजकारणाविषयी त्यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.

नुकतेच मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊन गेले, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या जाहीर सभेचे आयोजन मुक्ताईनगर येथे करण्यात आले होते, यावेळी आ. पाटील यांनी ते दिल्ली वाऱ्या का करीत आहेत? अमित शाह यांना का भेटत आहेत? असे असे प्रश्न उपस्थित केले होते. याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी मदत केल्यामुळेच चंद्रकांत पाटील आमदार होऊ शकल्याचा गौप्यस्फोट करून भाजपाचे पितळ उघडे पडले होते.

गेल्या निवडणुकीत स्व- पक्षाशी गद्दारी करून भाजपाचीच शीट पाडण्याचं महापाप मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. मुळातच ज्या व्यक्तीने आयुष्यभर भाजपाची इमाने ईदबारे तिकीट वाटपाचे काम केले, त्याच आमदार खडसेंना तिकीट नाकारून भाजपाने त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या सौ रोहिणी ताई खडसे यांना ऐनवेळी भाजपाचे तिकीट डिक्लेअर करून त्यांचा पराभव कसा करता येईल याची रणनीती भाजपाने आखली. जे जे या रणनीती मध्ये सहभागी होते, ते सर्व गद्दार भाजपायी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत व्यासपीठावर बसलेले होते…. असे स्वतः आमदार एकनाथराव खडसेंनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

पेट्रोल-डिझेलमध्ये चढ-उतार

Next Post

कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेत सहभागी व्हा

Next Post
कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेत सहभागी व्हा

कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेत सहभागी व्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group