महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ठरवित असतात. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी झाले आहेत.
तरीही तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कमी केली नाही. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर काय आहेत. देशात जवळपास 136 दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून इंधन दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील इंधन दर स्थिर आहेत.
देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?
– मुंबई : पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
– चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरात दर काय?
– नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
– पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
– कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
– औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
मोबाईलवर पाहता येतील इंधन दर
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे (SMS) देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.