Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पक्षाने संधी दिल्यास सोने करू – केदा आहेर
    जळगाव

    पक्षाने संधी दिल्यास सोने करू – केदा आहेर

    editor deskBy editor deskOctober 4, 2022Updated:October 4, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विजय पाटील 

    येत्या काही दिवसात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होत आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक मतदार संघातील अनेकांनी आतापासून गुघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तर अनेक पक्षाचे दिग्गज उमेदवारांना पराभू करण्यासाठी नवीन चेहऱ्याना संधी मिळण्यासाठी काही नवखे आपले भवितव्य उजळू पाहत आहे. त्यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातील जळगाव- धुळे-नंदुरबार या जिल्ह्यातील पदवीधर मतदार संघाच्या नव मतदार नोदणीवर भर देत आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी दिवसरात्र करून नोदणी करण्यासाठी सज्ज आहे. तरी नाशिक मतदार संघातील मतदारांनी लवकर नोदणी करून घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.

    नाशिक पदवीधर मतदारसंघ हा सद्या कॉंग्रेसचे आ.सुधीर तांबे यांच्या ताब्यात आहे. तांबे यांनी देखील मोठ्या प्रमाणात गाठीभेटी सुरू केल्या असून पुढची निवडणूक स्वतः किंवा त्यांचे पुत्र युवानेते सत्यजीत तांबे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात भाजपतर्फे केदा आहेर हे बेरजेचे राजकारण करत मैदानात उतरतील का हे बघने महत्वाचे ठरेल. आहेर हे गेल्या दोन टर्म पासून विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी आपले बंधूं आ राहुल आहेर यांना शब्द दिल्याने त्यांनी भावाला आमदार केले. दोन वेळा राहुल आहेर यांना निवडून आणण्यात केदा आहेर यांचा मोलाचा वाटा आहे. असे असले तरीही अद्याप आ.राहुल आहेर यांनी कधीही केदा आहेर यांना भाजपाने उमेदवारी देण्याची मागणी केली नाही. आ राहुल आहेर यांनी पक्षाकडे मागणी करावी असे देखील कार्यकर्ते खाजगीत सांगत असतात. कदाचित विधानसभेत ‘दादा’ अन् विधान परिषदेत ‘नाना’ असे समीकरण जुळवण्यासाठी हे पाऊल नाही ना अशी देखील चर्चा सुरू आहे. जर केदा आहेर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर त्यांच्यात व विरोधक उमेदवारामध्ये चांगलीच रस्सीखेच या निवडणुकीत दिसायला मिळणार आहे.

    सोशल मिडीयावर निवडणुकीचे वातावर तापले
    सोशल मीडियावर नाना समर्थक मोठ्या प्रमाणात भावी आमदार म्हणून पोस्ट व्हायरल करत असतात, कार्यकर्त्यांच्या भावना नानांनी मनावर घेत पदवीधर मतदार वाढवण्याची हालचाली तर सुरू केल्या नाहीत न अशी शंका उपस्थित होतेय. नानांच्या पदवीधर उमेदवारीसाठी आ राहुल आहेर देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावतील कारण पुडचा त्यांचा मार्ग सोयीस्कर होईल. हे सर्व बघता भविष्यात या बंधूंच्या हालचालीकडे लक्ष लागून आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात एकूण सहा जिल्हे येतात या जिल्ह्यात प्रामुख्याने भाजपा व शिंदे गटाचे प्राबल्य अधिक असल्याने आगामी निवडणूक भाजपच्या दृष्टीने फायद्याची असणार आहे.

    पक्षाने संधी दिल्यास सोने करू – केदा आहेर
    येणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून त्यासाठी नाव नोद्निसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरु केली आहे . जर भारतीय जनता पार्टी पक्षाने संधी दिल्यास त्या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी बोलताना जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे.

    काय हवे नोंदणीसाठी ?
    नाशिक पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी दावेदाराचा १ पासपोर्ट फोटो, पदवी , ३ वर्षांची पदविका प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड झेरॅाक्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पोस्टाचे खातेपुस्तक, गॅसकार्ड, लाईटबील, पासपोर्ट, बॅंक पासबुक यापैकी एकाची झेरॅाक्स प्रत आवश्यक आहे . यासाठी पदविका धारकांनी संबंधित भाजपच्या तालुका अध्यक्षकांशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी.

    आगामी होऊ घातलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकिसाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. भाजपा कडू उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली असुन ,राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जात आहे . पक्ष नेतृत्व देईल त्या उमेदवाराला निवडुण आणण्यासाठी भाजपच्या जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी व जास्तीत जास्त पदवीधरांची नाव नोंदणी करून घ्यावी ,असे आवाहन शेवटी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.