धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या कार्याची माहिती दिली.
गांधीजींनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी सदैव कटिबद्ध राहून देश एकसंध ठेवण्याचं कार्य केले. अहिंसेच्या मार्गावर चालून सुध्दा क्रांती घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गांधीजी. शास्त्रीजींच्या चरित्रातून आदर्श काय घ्यावा तर उच्च पदावर राहून सुध्दा साधं राहणं. रेल्वेमंत्री, प्रधानमंत्री अशा उच्च पदावर असतांना देखील शासकीय सुविधांचा गैरवापर करू नये हे समजून घ्यायचे असेल तर शास्त्रीजींच्या चरित्राचा अभ्यास नक्की केला पाहिजे, असे लक्ष्मणराव पाटील म्हणाले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.