धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील डॉक्टर संघटनेने त्यांच्या विविध मागणीसाठी दि २ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची नुकतीच पाळधी येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेवून निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.मिलिद डहाळे, डॉ.प्रशांत भावे, डॉ.रमेश पाटील, डॉ.मनोज अमृतकर, डॉ.पंकज अमृतकर, डॉ.शैलेश सूर्यवंशी, डॉ.चेतन भावसार, डॉ.मनीष जैन यांनी भेट घेत निवेदन दिले. यावेळी मंत्री पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे समजते.