Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन
    जळगाव

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन
    विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 3, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : यापूर्वी गणेशोत्सव आला की कायदा सुव्यवस्था यासाठी बैठका बोलविण्यात येत असत मात्र गेल्या वर्षांपासून कोव्हिडं मुळे निर्बंधआली मात्र जलगावकारांनी यात चागले सहकार्य केले आणि संकटातही सर्वांनी आनंदाने गणेश उत्सव साजरा केला एक ठिकाणी परवानगी देण्याची सोय करण्यात येणार असून मिरवणुकीत ढोल ताशे वाजता येणार नाही मात्र जागेवर ढोल ताशे वाजता येईल त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीर, मतदार नोंदणीबाबत जनजागृती सारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.


    सार्वजनिक गणेशोत्सव 2021 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात अभिजित राऊत यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महापालिकेचे उपायुक्त प्रविण पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.          
    जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की ,गणेशोत्सव बाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक  सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमाबरोबर लसीकरण शिबिराचे आयोजन करावे. त्याचबरोबर उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा या उपक्रमातंर्गत मतदार नोंदणी, आजादी का अमृत महोत्सव यासारखे उपक्रम राबवावे. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. पूजा व आरती करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळाकरीता मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, वेबसाईट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करुन द्यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाच्या व्यवस्थेसह शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जाऊन यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने व भक्तीभावात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


    यंदाचा गणेशोत्सव हा आनंदोत्सव म्हणून साजरा करुया – डॉ. मुंढे

    शासनाच्या मार्गदशक सुचनांनुसार सार्वजनिक मंडळानी नियमांचे पालन करावे. गणेश मंडळाना कमीत कमी कागदपत्रांमध्ये आवश्यक ती परवानगी देण्यात येईल यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येऊन गणेश मंडळांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे सांगून डॉ मुंढे म्हणाले की, यावर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय वातावरणात आनंदोत्सव म्हणून साजरा करुया. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाद्यवृंद पथकांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यासाठी शहरातील मोकळ्या जागेत त्यांचे कार्यक्रम घेऊन त्याचे लाईव्ह सादरीकरणाबाबत विचार करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी यावेळी सांगितले.
    यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे यांनी मंडळाची भूमिका, कार्यपध्दती व स्थापना आणि विर्सजनाबाबतची भूमिका विशद करुन गणेश मंडळांच्या ठिकाणी ज्यांना रोजगार पाहिजे त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
    यावेळी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता, वीजेच्या तारांजवळील झाडांच्या फांदा काढणे यासारख्या विधायक सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्व यंत्रणांना दिली.
    या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंधा (भापेसे), प्रांताधिकारी प्रसाद मते, डॉ विक्रम बांदल, विनय गोसावी, यांचेसह महापालिका, वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने कणखर नेतृत्व गमावले – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    January 28, 2026

    वाळू वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी ३० हजारांची लाच; तलाठी अटकेत

    January 28, 2026

    सीसीटीव्ही व डम्प डेटामुळे दुचाकी चोरटे गजाआड; अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.