धुळे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामध्ये शिवसेनेची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना त्यांच्या गटात आणत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला नेहमीच खिंडार पडत आहे, तर नुकेतच मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सांगितले की, लवकरच उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सामील होणार असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेनेसाठी धक्काच होता. मात्र आता अजून एक मोठा धक्का म्हणजे गुलाबराव पाटील यांनी केलेले वक्तव्य ते म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सामील होणार.
धुळ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सहभागी होतील. तसेच “गुलाबराव पाटलांनr ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेंना उधान आले आहे.