धरणगाव : प्रतिनिधी
पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा दुवा असतो. या ठिकाणी येणाऱ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पोखरी तांडा येथील उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण, नव्याने अंगणवाडी, ग्रामपंचायत समोरील चौक येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे आदी कामांना मंजुरी देऊन गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करणार असल्याचे घोषित केले. ते धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले.
पोखरी तांडाचे भाग्य उजळले !
एकलग्न व पोखरी तांडा ही ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यामुळे तांड्याच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेऊन पोखरी तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत तिचा दर्जा देऊन दि.३०/०८/२०१९ ला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून शासन मान्यता मिळविली. त्यानंतर डिसेंबर २०२० ला ग्रामपंचायत निवडणूक संपन्न झाली व लागलीच २ महिन्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करण्यात आले. पोखरी तांडाला स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यापासून केवळ २ वर्षात सुमारे १ कोटींचे कामे ना. गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य यांनी मंजूर केली. त्यांपैकी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोखरी तांडा येथील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यात ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम – २० लाख; गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे – ६ लक्ष; जिल्हा परिषदेच्या शाळा खोली इमारत बांधकाम करणे – 8 लक्ष , अंगणवाडी इमारत बांधकाम ६.५० लक्ष अशा विविध विकास कामांचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हायवे ते पोखरी डांबरीकरण करणे ४५ लक्ष, पाळधी बस स्टँड ते पोखरी तांडा फाटा डांबरीकरण करणे १० लक्ष, स्मशानभूमी बांधकाम ५ लक्ष, आदी कामानाही मंजुरी मिळाली असून लवकरच सुरुवात होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतीशाबाजीने शाल , श्रीफळ व गुलाब बुके देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले होते. यावेळी संजय पाटील सर व माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख उसंजय पाटील सर, उद्योगपती दिलीपबापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी पं.स.सभापती अनिल पाटील, सरपंच गोकुळ शिंदे , उपसरपंच नवल पारधी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई शिंदे , अमिताबाई चव्हाण , ज्ञानोबाई राठोड, अर्जुन राठोड , सुभाष भराडी, एकनाथ ठाकरे , शाखा प्रमुख महेंद्र शिंदे , गोपाल शिंदे, जितेंद्र पाटील शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम पाटील, उपशिक्षक नाना पाटील, रवि पाटील, परिसरातील सरपंच उपसरपंच संजय पाटील, नवल पाटील, भागवत पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, टिकाराम पाटील, सुरेश पवार, किशोर पाटील, गोकुळ नाना पाटील, शे.आजम मण्यार, वर्ड व्हिजनचे अनिल सर, अंगणवाडी सेविका लताबाई सोनवणे, मदतनीस वंदना शिंदे , कविता शिंदे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक नाना पाटील सर यांनी केले तर आभार सरपंच गोकुळ शिंदे यांनी मानले.