Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुसाईड नोट लिहून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने घरात गळफास घेवून केली आत्महत्या
    क्राईम

    सुसाईड नोट लिहून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने घरात गळफास घेवून केली आत्महत्या

    editor deskBy editor deskOctober 1, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील अयोध्यानगर येथे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली आहे. भागवत शामराव जाधव वय ४८ रा. गणपती मंदिराजवळ, अयोध्यानगर असे मयताचे नाव आहे. घरांत सर्वांना कळेल म्हणून भागवत जाधव यांनी बाहेर जावून सुसाईड नोट लिहली. त्यानंतर घरी आले कुणाला कळू दिले नाही, की त्याच्या मनात काय सुरु आहे म्हणून मुलाचा मुका घेतला, त्याला खर्चासाठी पैसेही दिले. तो बाहेर गेल्यानंतर भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुसाईडनोटमध्ये ज्या तिघांनी फसवणूक केल्याचा उल्लेख आहे, त्याच तिघांच्या दबावाला कंटाळून भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयत भागवत जाधव यांच्या मुलांनी केला आहे.

    नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत शामराव जाधव (वय-४८) रा. गणपती मंदीराजवळ, अयोध्यानगर, जळगाव हे आपल्या पत्नी सुनीता, तेजस व योगेश या दोन मुलासंह वास्तव्याला होते. त्यांचे अजिंठा चौक येथे भागवत ट्रान्सपोर्ट नावाने ट्रकच्या माध्यमातून सामानांची ने-आण करत होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता भागवत जाधव यांच्या पत्नी सुनिता बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले कॉलेजला गेले. अर्ज भरायचा असल्याने तेजस घरी आला यादरम्यान भागवत जाधव हे बाहेर गेले व काळी वेळातच परत आले. त्यांनी तेजसचा मुका घेतला, त्याला अर्ज भरण्यासाठी आवश्यक पैसेही दिले. त्यानंतर घरात गेले व तेजस अर्ज भरायला निघून गेला. त्यानंतर घरी एकट्या असलेल्या भागवत जाधव यांनी घराची दोन्ही दरवाजे बंद करुन घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी १२.३० वाजता सुनिता ह्या घरी आल्यावर त्यांना पती भागवत जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. सुनिता जाधव यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरीकांनी धाव घेत खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.

    भागवत जाधव यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील या तीन जणांची नावे लिहीली आहे. आठ दिवसांपुर्वी दिनेश माने, बापू पाटील व कंपनीचे मालक पाटील यांनी त्यांच्या ट्रकमध्ये सामान भरून कलकत्ता येथे पाठविण्यासाठी सांगितले. परंतू भागवत जाधव यांनी ट्रकमध्ये माल लोड करू नका असे सांगितले. परंतू जबरदस्तीने सामान ट्रकमध्ये भरला. याच्या मोबदल्यात ४५ हजार रूपये ॲडव्हान्स देणार होते. परंतू अद्यापपर्यंत कोणतेही पैसे दिले नाही. ट्रकचे फायनान्सचे हप्तेही चुकले , चार पाच दिवसांपासून झोप येत नाही, त्यामुळे आता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

    दरम्यान, दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील हे गुरूवारी रात्री यांनी वडील भागवत जाधव यांना बोलावून धक्काबुक्की केली होती. तिघांच्या दबावातून वडीलांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मयत भागवत जाधव यांचा मुले योगेश, तेजस यांनी बोलतांना केला आहे. तिघांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. अखेर पोलिसांनी याप्रकरणी अर्ज द्या, चौकशी करुन गुन्हा दाखल करुन असे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.