Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » Big Breking : जळगाव जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले
    क्राईम

    Big Breking : जळगाव जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले

    editor deskBy editor deskOctober 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आगामी जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण आज सकाळी जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार याबात संभ्रमाचे वातावरण आहे. कारण प्रभाग रचनांवरून सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबीत असून यासोबत ओबीसी आरक्षणाचा तिढा देखील सुटलेला नाही. यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

    निवडणुकांबाबत संभ्रम असला तरी निवडणूक आयोगाने निवडणुकांची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याबाबत राजपत्रात देखील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधील ३४ नगरपालिकांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले असून यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले निघाले आहे. अर्थात, जि.प. अध्यक्षपद हे अनारक्षीत असल्यामुळे यासाठी आता प्रचंड चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने यावर पुरूष सदस्य विराजमान होण्याची शक्यता यातून बळावल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी जि.प. निवडणुकांमधील चुरस ही प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.