जळगाव : प्रतिनिधी
नुकतेच दोन ते तीन दिवसापासून आ.बच्चू कडू यांचा सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज जळगाव उपजिल्हाधिकारी भारदे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी जळगाव शहरातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अचलपूर मतदार संघातील गणोजा ता. चांदूरबाजार जि. अमरावती येथील घटनेविषयी आ.बच्चू कडू यांच्या संदर्भात खोटे व बनावट(मिक्सिंग) केलेला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. आ.बच्चू कडू हे कुठल्याही प्रकारचे राजकीय पार्श्वभूमी नसतांना अपक्ष म्हणून चौथ्यांदा निवडून आलेले आहेत.त्याबाबत लोकशाहीच्या माध्यमातून जनताहिच राजा व मतदार असते. त्या बळावर बच्चू कडू हे सातत्याने निवडून येत आहेत. त्याच्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी युवक अध्यक्ष निलेश बोरा, युवक उपाध्यक्ष सागर गवळी , युवक संघटक लक्ष्मण पाटील, कैलास महाजन, सै.अकील सै.अब्दुल्ला, शेख शकील शेख मुताली आदी उपस्थित होते.