धरणगाव : प्रतिनिधी
येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दि.३०सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थिनीसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. पाटील हे होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी.वळवी, राष्ट्रिय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. संजय शिंगाणे तसेच ग्रामीण रुग्णालय धरणगाव इथून डॉ. गिरीश चौधरी, डॉ.मयुर जैन, श्री. शिंपी,श्री.गणेश कुंभार व त्यांची सर्व टीम आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते.या शिबिरामध्ये कोविड लसीकरण, रक्ततपासणी, वजन व उंची यांची तपासणी, ॲनिमिया तपासणी, निदान व औषध उपचार करण्यात आले.या शिबिरासाठी महाविद्यालयातील दीडशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजितजोशी, सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन तर आभार डॉ. ज्योती महाजन यांनी मानले. या शिबिरांमध्ये विद्यार्थिनींमध्ये दिसणारे विविध आजार याची माहिती डॉ. गिरीश महाजन यांनी दिली तर आपल्या दातांची काळजी कशाप्रकारे घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन डॉ.मयुर जैन यांनी केले तसेच विविध आजारापासून कशाप्रकारे आपला स्वतःचा बचाव करता येतो याबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.