जळगांव प्रतिनिधी: येथे “श्री कृष्ण जन्माष्ठ्मी” कोरोना निर्बंधाचे पालन करून उत्साहात झाली साजरी करण्यात आली. श्री कृष्णांना १०८ भोग व भजन कीर्तनात भक्त गण झाले मंत्रमुग्ध. तब्बल “सव्वा मण (५०किलोने) मिरची, मीठ व मोहरीने” श्री कृष्ण लालांची नजर कडकडीत नजर उतरविण्यात आली.
“श्री राधे सरकारांच्या” श्री बालाजी दरबारात, महात्मा गांधी मार्केट जळगाव येथे श्री कृष्ण जन्माष्ठमीला ३० रोजी रात्री १२:०० वाजता १२१ नैवद्य निवेदन केल्यावर महाआरती करण्यात आली नंतर ०१:०० वाजता नंदोउत्सवाला सुरवात झाली त्यानंतर श्री कृष्ण लालांची झुल्यातच भजन कीर्तनाच्या तालात तब्बल “सव्वा मण (५०किलोने) मिरची, मीठ व मोहरीसह” “श्री कृष्ण लालांची नजर कडकडीत नजर उतरविण्यात आली”. तद्नंतर दहीहंडीचा कार्यक्रम होऊन गोपाळकाला सेवेकरी तसेच भक्तगण यांना प्रसाद रुपी वाटण्यात आला. देवांची भक्तगण रात्रं-दिवस गुण-गाण करतात त्याने ते भारले जातात म्हणून श्री कृष्ण बाळगोपाळांची नजर हिंदू शास्त्रानुसार उतरविण्यात येते भक्तांच्या मनात नजरेने भारला जातो म्हणून श्री कृष्ण बाळगोपाळांची उतरविण्यात येते.