Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाराष्ट्राने एक भावी आधिकारी गमावला !
    क्राईम

    महाराष्ट्राने एक भावी आधिकारी गमावला !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    स्पर्धा परीक्षेचा अभ्यासकरुन आधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुणे म्हणजे ज्ञानाची पंढरीच म्हणावी लागेल. तर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी परीक्षेचे उमेदवार दिल्लीला जातात तर महाराष्ट्र राज्य आयोग अर्थात एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी परीक्षेचे उमेद्वार पुणे निवडतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास दिल्ली किंवा पुण्यातूनच होतो असं काही नाही. पण तालीम ती तालीमचं. म्हणून पुण्यातली भरपूर तरुण मंडळी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दिसून येतात.

    एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांसंदर्भात एक भयानक घटना पुण्यात घडली आहे. अभ्यासासाठी अभ्यासिकेत गेलेल्या एका मुलीचा चक्क हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं सांगितलं जातयं. सतत अभ्यासचा विचार करुन त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये पाहालया मिळते. वाढत्या स्पर्धेमधे आपण टिकलं पाहिजे आणि त्यासाठी जास्त मेहनत घ्यायला पाहिजे, म्हणून स्पर्धा परीक्षेचे उमेदवार तणाव घेत असतात. असाच काहीसा तणाव या मुलीने घेतला असावा. कारण, वैद्यकतज्ज्ञांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली असून चंदननगर पोलिसानी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.