मुंबई : वृत्तसंस्था
दोन दिवसांपूर्वी, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. असा इशारा त्यांनी दिला. तसेच, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना , मी बेरोजगार आहे.मी तुम्हाला काय रोजगार देऊ? असा उलट सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चेला उत आला आहे दरम्यान, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे.
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. भाषणादरम्यान, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी मला संपवू शकत नाही. अस वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांनी हा मुद्दा हाती घेत पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधान मिटकरींनी केलं आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत.