जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगाव जिल्हाधिकारी पदी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांचे कडून देण्यात आली आहे.
डॉ.अभिजीत राऊत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांच्या जागी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची जिल्हाधिकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.