फैजपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वडील आणि मुलगा बँकेतून पैसे काढून घरी जात असतांना एका दुचाकीवर असलेले दोन अनोळखी इसमानी हातातून पिशवी घेत पसार झाले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील केळी वेफर्स बनविणारे मुलगा व वडील फैजपूर येथील स्टेट बँकेच्या शाखेत दि २८ रोजी दुपारी १ लाख रुपये काढून घरी जात असताना पीपरूड शिवारातील आकाश लक्ष हॉटेल जवळ त्यांची दुचाकी बंद पडली ते याठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभे असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर २ अनोळखी इसम २५ ते ३५ वयोगटातील याठ्कानी येत त्यांच्या हातातील पिशवी हिस्कावीत फैजपूरच्या दिशेने पळून गेले. यावेळी सुधाकर गोडू पाटील (वय ५२) यांनी फैजपूर पोलीस स्थानकात धाव घेत २ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी एम.जे.शेख हे करीत आहेत.