धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील तहसिल कार्यालय येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हे ब्रीद असलेला सेवा पंधरवाडा साजरा करण्यात आला या अंतर्गत 20 उत्पन्न दाखले,15 जात प्रमाणपत्र, व 10 नागरिकांना रेशन कार्ड वितरित करण्यात आले.सदर पंधरवाडा 2ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.तसेच माहिती अधिकार दिन अंतर्गत सर्व कार्यालयीन कर्मचारी यांना तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी माहिती अधिक्कारबाबत माहिती देऊन सर्व नागरिकानी याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन तहसीलदार देवरे यांनी केले. या कार्यक्रमास नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते व इतर सर्व कर्मचारी,सेतू चालक हजर होते.
सर्व नागरिकांनी सेवा पंधरवाडा अंतर्गत आपले आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयात काढून घ्यावेत.विद्यार्थ्यांनी देखील या पंधरवाड्याचा लाभ घायवा.असे आवाहन यावेळी करण्यात आले.