जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामदास कॉलनीतील विवाहितेचा ठाणे येथील सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामदास कॉलनीतील माहेर असलेल्या ३४ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या नणंदेसाठी शिक्षणासाठी पैसे आणावे अशी मागणी पती प्रतिक सुभाष पाटील, सासू आशा सुभाष पाटील, सासरे सुभाष गणपत पाटील, नणंद प्रतीक्षा सुभाष पाटील रा.मानसरोवर ठाणे यांच्याविरोधात विवाहिता प्रियका प्रतिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशांत पाठक हे करीत आहेत.