श्री सत्यसाई सेवा समिती व डॉ सुनील राजपूत यांचा पूरग्रस्त बांधवांसाठीचा मदतीचा ओघ आजही सुरूच.
लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांचे अतिवृष्टीमुळे खूप प्रचंड नुकसान झालेले आहे.त्यातच तालुक्यातील बाणगावात देखील शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड नुकसान झालेले आहे.गावातील घरांमध्ये संपूर्ण पुराचे पाणी आल्यामुळे अन्न व इतर जीवनावश्यक वस्तू सडक्या झालेल्या आहेत.त्यात अनेकांचे गुरे,घरे,संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर इतर शेतकऱ्यांचे देखील शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे.
अशा बाधित बांधवांना आज मदतीची व सहकार्याची गरज निर्माण झालेली आहे.अशा बाधितांसाठी श्री सत्यसाई आपत्ती व्यवस्थापन,मेडीकेअर प्रोजेक्ट व डॉ सुनील राजपूत मित्र मंडळ यांचा मदतीचा ओघ आजही सुरूच असून आज बाणगावात फिरता दवाखाना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाची यादी बनवून औषधोपचार व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अतिशय विदारक परिस्थिती या महापुरामुळे बाणगावात निर्माण झालेली आहे,तसेच गावात अतिवृष्टीमुळे दुर्गंधी देखील निर्माण झालेली आहे त्यासाठी समितीच्या वतीने कुटुंबाची आरोग्याची काळजी म्हणून गावात फवारणी करण्यात येणार आहे.
तसेच अमृतकलश या माध्यमातून (तूर डाळ, मूग डाळ, परिवार तेल पाऊच, चहा, साखर, टाटा मीठ, शेंगदाणे, मिरची, हळद, कपडा साबण, अंघोळीचा साबण, माचिस, मोहरी) यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे गरजू व बाधित कुटुंबांना आज वाटप करण्यात आले.उद्या देखील कन्नड तालुक्यातील व चाळीसगाव तालुक्यातील बाधित गावात या समितीद्वारे भेट घेऊन मदतीचा हा रथ अविरतपणे चालू ठेवण्याचा मानस समितीने केलेला आहे.इतरही सामाजिक संघटना यांनी पुढे येऊन या पूरग्रस्त बांधवांसाठी सहकार्य व मदतीचे आवाहन श्री सत्यसाई सेवा समिती व डॉ सुनील राजपूत मित्र मंडळाने केले आहे. याप्रसंगी उपस्थित डॉ.सुनील राजपूत, अरविंद परदेशी सरपंच, विजय देवरे सर, नारायण नथू पाटील, छोटू महाराज, समाधान शेलार, सुभाष कारभारी, विजय परदेशी, भाईदास गोलाईत, राजू पवार, दत्तू पाटील, रावसाहेब पाटील, खुशाल पवार, सत्यसाई सेवा समितीचे श्री राजेंद्र राठी, अजय जोशी, प्रितेश कटारिया सामाजिक कार्यकर्ते, प्रवीण रामचंद्र जाधव तसेच बाणगाव गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.