जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोलाणी मार्कट परिसरातून एका खाजगी नोकरी करणाऱ्या युवकाची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दि २७ रोजी जळगाव शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील गोलाणी मार्कट परिसरातील मनपाच्या मागील बाजूस असलेले अग्निशमन दलाच्या कार्यालाजवळ लावलेली क्र.एम.एच.१९ सी.एम.५८८९ दुचाकी पर्कीगच्या जागेवर लावलेली असताना कुणीतरी स्वताच्या फायद्यासाठी लांबविल्याची घटना दि २६ रोजी घडली असून अजय प्रदीप चांदेलकर यांनी शहर पोलिसात धाव घेत दुचाकी चोरीबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.