नशिराबाद पोलिसात गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) ५० वर्षीय व्यक्तीने ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका ५० वर्षीय इसमाने ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस घरी खेळायला बोलवत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बाळू वासुदेव महाजन (वय ५०) यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजेंद्र साळूखे हे करीत आहेत.