जळगाव : प्रतिनिधी
युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल येथे करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातून १५ मुलांचे तर मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वा. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व महापौर जयश्री महाजन, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपूरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर, कुलभूषण पाटील, विस्तारक चैतन्य बनसोडे, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी, सत्यजीत पाटील, जाकीर पठाण, युवासेनेचे उपजिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, महानगर युवाअधिकारी विशाल वाणी, लोकेश पाटील आदि उपस्थित होते. खेळाडूंना सरावासाठी तसेच त्यांचा खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी याप्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे मत युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया यांनी मांडले.
स्पर्धेत मुलांमध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी विजयी, पाचोरा बास्केटबॉल गृप उपविजयी तर तृतीय क्रमांक राष्ट्रीय क्रिडा मंडळ, चाळीसगाव यांनी पटकवीला. मुलींच्या गटात सेंट जोसेफ बास्केटबॉल अकॅडमी विजयी, जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन उपविजयी ठरले. उत्कृष्ठ खेळाडू म्हणजे पाचोरा येथील जयेश देवरे तर उत्कृष्ट नेमबाज म्हणून जैन स्पोर्टस् अकॅडमीचे संदिप चौधरी यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमाकांत जाधव यांनी केले.
बक्षीस वितरणाप्रसंगी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण धनावडे, नगरसेवक नितीन बरडे, आशा कावडीया, संजय जगताप जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे उपस्थित होते.
पंच म्हणून दिनेश पाटील, वाल्मिक पाटील, सचिन पाटील, आशिष पाटील, निखिल झोपे, वसिम शेख, लौकिक मुंदडा, भगवान महाजन, धनराज चव्हाण, संकेत भुतडा, जावेश शेख, कुमारी सोनल पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, जळगाव जिल्हा हौशी उमाकांत जाधव, अजय खैरनार, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, भूषण सोनवणे, राहूल चव्हाण, ऋषीकेश देशमुख, जयेश नेवे, शैलेंद्र राजपूत, अमोल सोनवणे, पंकज पाटील आदींनी परिश्रम घेतले