Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावच्या चंदन पाटलांचा जळगावात मंत्री महाजन यांच्या हस्ते पक्ष प्रवेश
    जळगाव

    धरणगावच्या चंदन पाटलांचा जळगावात मंत्री महाजन यांच्या हस्ते पक्ष प्रवेश

    editor deskBy editor deskSeptember 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील यांनी आज अखेर ठरल्या प्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात आपल्या अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात आज दुपारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटील यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ हे उपस्थित होते.

    तर आज चंदन पाटील यांच्यासोबत शहरासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, भवरखेडा येथील विकास सोसायटीचे संचालक निलेश पाटील, अमोल माळी, भागवत मराठे, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, भाऊसाहेब पाटील, भूषण पाटील, अशोक पाटील, रमण धनगर, परेश जाधव, ईश्वर चौधरी, दीपक चौधरी, मनोहर पाटील, भावेश पाटील, हेमंत पाटील, कुणाल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

    भाजपला युवा ताकद मिळाली : गिरीश महाजन
    चंदन पाटील यांच्या प्रवेशावर ना. गिरीश महाजन यांनी चंदन पाटील यांच्या निमित्ताने जळगाव ग्रामीणमध्ये भाजपला युवा ताकद मिळाली असल्याचे सांगितले. तसेच धरणगाव तालुक्यात थोडी फार राहिलेली कॉंग्रेस देखील संपुष्टात आल्याचे सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.