जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होण्यास सचिन पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक असलेल्या जवळपास ९२ आमदारांनी विरोध दर्शवत आपला राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी अशोक गेहलोत शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून येत्या १७ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होती पण गेहलोत यांनी आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी नवी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे.
अशोक गेहलोत यांना समर्थन असणाऱ्या तब्बल 92 आमदारांनी पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवला असून विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेसचा खेळ बिघडला आहे. अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रासारखाच शिंदे पॅटर्न वापरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘एक व्यक्ती एक पद’ या काँग्रेसच्या योजनेनुसार गेहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे असेल तर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे पण त्यांना दोन्ही पद आपल्या हातात हवे आहेत. त्यामुळे हा सगळा राजकीय वाद सुरू झाला आहे. तर ९२ आमदारांच्या राजीनाम्याचे शस्त्र पुढे करत त्यांनी खेळलेली खेळी यशस्वी होणार का याकडे लक्ष लागले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत पण काँग्रेसच्या एक पद एक व्यक्ती या धोरणामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. पण त्यांना दोन्ही पदं आपल्याकडे हवे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ही खेळी खेळली आहे. हे आमदार आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवणार असून राजस्थान काँग्रेसमध्ये पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.