जळगाव : प्रतिनिधी
आज दि २५ रोजी सकाळी शहरातील बजरंग बोगदा येथे मालवाहू गाडी अमृत योजनेच्या खड्ड्यामध्ये अडकल्याने सुदैवाने यात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. परतू या भोंगळ कारभाराविरोधात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दुर्गेश दुर्गेश निंबाळकर यांनी मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर रेखोट्या ओढल्या आहे.
शहरात गेल्या कित्येक दिवसापासून अमृत योजनेचे पाईप लाईनचे काम सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी काम झाले त्यठिकाणी पडलेले खड्डे मात्र व्यवस्थित बुजले जात नसल्याने दुचाकी व मालवाहू गाडी फसत आहे. आज दि २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील प्रेम नगर जवळील बजरंग बोगदा येथे एक मालवाहू गाडी या खड्ड्यात फसली सुदैवाने यात चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे चांगलेच नुकसान झाले असल्याचे समजते. या अमृत योजनेचा भोंगळ कारभार वारवार समोर येत असून तरीही कुठलीही कारवाई होत नसल्याचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दुर्गेश निंबाळकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.



